हिंदुस्थानच्या कुमार संघाने तिरंगी मालिका जिंकली,बांगलादेशला 6 गडी राखून चारली धूळ

379

सामना ऑनलाईन, होव (इंग्लंड)

हिंदुस्थानच्या कुमार संघाने बांगलादेशवर सहा गडी आणि आठ चेंडू राखून मात करीत 19 वर्षांखालील एकदिवसीय तिरंगी क्रिकेट मालिका जिंकली. या मालिकेत तिसरा संघ अर्धातच इंग्लंडचा होता. कर्णधार प्रियम गर्गसह यशस्वी जैस्वाल, दिव्यांश सक्सेना व धुव जुरेल यांनी झळकाविलेली अर्धशतके ही हिंदुस्थानच्या डावाची वैशिष्टय़े ठरली. बांगलादेशकडून महमुदुल हसनने ठोकलेले शतक व्यर्थ ठरले.

बांगलादेशकडून मिळालेले 262 धावांचे लक्ष्य हिंदुस्थानने 48.4 षटकांत 4 बाद 264 धावा करून पूर्ण केले. यशस्वी जैस्वाल (50) व दिव्यांश सक्सेना (55) यांनी 104 धावांची सलामी देत हिंदुस्थानला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर कर्णधार प्रियम गर्ग (73) व धुव जुरेल (नाबाद 59) यांनीही अर्धशतके झळकावीत हिंदुस्थानला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. अखेरच्या क्षणी तिलक वर्मानेही नाबाद 16 धावा करून हिंदुस्थानवरील दबाव वाढणार नाही याची काळजी घेतली. त्याआधी, नाणेफेक जिंकून बांगलादेशने सर्वबाद 261 धावसंख्या उभारली. तन्झीत हसन (26) व परवेझ हौसेन (60) यांनी अर्धशतकी सलामी दिल्यानंतर महमुदुल हसनने 109 धावांची खेळी केली. कार्तिक त्यागी व सुशांत मिश्रा यांनी 2-2 फलंदाज बाद केले

आपली प्रतिक्रिया द्या