
आरे ते कफ परेडदरम्यान धावणाऱ्या भुयारी मेट्रोच्या प्रवाशांना आता व्हॉट्सअॅपच्या सहाय्याने तिकीट मिळवता येणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने आता मेट्रो प्रवाशांसाठी व्हॉट्सअॅपवरून तिकीट घेण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. तसेच मेट्रो स्थानकांमध्ये मोफत वायफायची सुविधा उपलब्ध केली आहे. प्रवासी व्हॉट्सअॅपवरून एकाचवेळी सहा क्यूआर तिकिटे खरेदी करू शकणार आहेत. मोबाईल नेटवर्पच्या समस्येमुळे गैरसोयीचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमीवर ‘पे लोकल फिनटेक’ कंपनीच्या सहकार्याने व्हॉट्सअॅपच्या सहाय्याने तिकीट मिळवण्याची सेवा सुरू केली आहे. यासाठी प्रवाशांना स्वतंत्र अॅप डाऊनलोड करण्याची गरज नाही. प्रवासी व्हॉटसअॅप अकाउंटवरून थेट तिकीट खरेदी करू शकतात. यासाठी प्रवासी 9873016836 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर ‘हाय’ पाठवू शकतात किंवा स्थानकांवर लावलेल्या क्यूआर कोडला स्पॅन करून क्यूआर तिकीट मिळवू शकतील.