युनियन बँक ऑफ इंडियात 500 पदांची भरती

युनियन बँक ऑफ इंडियात स्पेशलिस्ट ऑफिसर (एसओ) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. असिस्टंट मॅनेजर (क्रेडिट) 250 पदे आणि असिस्टंट मॅनेजर (आयटी) 250 पदे या भरती अंतर्गत भरली जाणार आहेत. या भरतीत ओबीसी, एसटी, एससी, आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गांसाठी रिक्त जागा ठेवण्यात आल्या आहेत. शैक्षणिक पात्रता, निवड, वयोमर्यादा, पगारासंबंधीची माहिती बँकेची अधिकृत वेबसाइट unionbankofindia.co.in वर देण्यात आली आहे.