
केंद्रीय गृह मंत्रालयाने तत्कालीन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना बुलेटप्रूफ गाडी नाकारण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजीनामा देईपर्यंत तब्बल सहा महिने त्यांनी इनोव्हा गाडीतून प्रवास केल्याची माहिती आहे. धनखड यांच्या तीन उच्च सुरक्षा बीएमडब्ल्यू कार जुन्या झाल्याचे सांगत त्यांच्यासाठी नवीन बुलेटप्रूफ वाहनांची मागणी केली होती. त्यानंतर याप्रकरणी गृह मंत्रालयाने चौकशी करण्यासाठी मंडळ स्थापन केले जाईल असे कळवले, मात्र नोव्हेंबरमध्ये उपराष्ट्रपतींच्या कार्यालयाने नॉन बुलेटप्रूफ इनोव्हा घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राजीनामा देईपर्यंत ते याच कारमघून प्रवास करत होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तत्कालीन उपसचिवांनी केलेल्या पत्रव्यवहारातून अनेक गोष्टी समोर आल्या. या पत्रव्यवहारात म्हटले होते की, केंद्रीय गृह मंत्रालयाला कळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत की, उपराष्ट्रपतींच्या दैनंदिन प्रवासादरम्यान वापरण्यासाठी जुन्या वाहनांच्या जागी नवीन तीन बुलेटप्रूफ हाय-सुरक्षा असलेली वाहने घेण्याचे निर्देश देण्यात आले असून प्रक्रिया सुरू करण्याची विनंती करण्यात आल्याचे म्हटले होते.
z उपराष्ट्रपतींच्या तीनही वाहनांची तपासणी करण्यासाठी अधिकाऱ्यांचे मंडळ स्थापन करत आहेत. या मंडळात एनएसजीचे दोन आणि सीआरपीएफचा एक अधिकारी असून हे सर्व अधिकारी बुलेटप्रूफ वाहनांशी संबंधित तांत्रिक बाबींमध्ये जाणकार असल्याचे उत्तर गृह मंत्रालयाने दिले होते.