विद्यापीठाच्या परीक्षा 3 मेपर्यंत लांबणीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
exam
प्रातिनिधिक फोटो

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापाठानेही आपल्या सर्व लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा तसेच संलग्न महाविद्यालयांच्या पदवीस्तरावरील प्रथम व द्वितीय वर्षाच्या सर्व लेखी, प्रात्यक्षिक परीक्षा 3 मे पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षांचे नवीन वेळापत्रक 3 मे नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

उन्हाळी सत्राच्या मे आणि जूनमध्ये होणार्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या तारखाही पुढे ढकलण्यात आल्या असून त्यांचे स्वतंत्र वेळापत्रक जारी करण्यात येणार आहे. ह्यूमॅनिटीज, कॉमर्स ऍन्ड मॅनेजमेंट, सायन्स ऍन्ड टेक्नॉलॉजी, इंटरडिसिप्लिनरी स्टडीज आदी शाखांच्या 759 परीक्षांचा त्यात समावेश आहे.