अज्ञात विमानांचा सिरीयावर हल्ला

746

काही अज्ञात विमानांनी इस्रायलच्या सीमेजवळ असलेल्या सिरीयाला लक्ष्य करीत शुक्रवारी जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यामुळे सिरीयामध्ये मोठे अग्नितांडव झाले. अमेरिका आणि इराण यांच्यातील वादामुळेच हा हल्ला करण्यात आला असावा असे म्हटले जात आहे. सिरीयामधील मानवाधिकार हक्क संघटनेच्या सदस्यांनी सांगितले की, या विमानांनी इराणविरोधी दहशतवाद्यांचे बाहुल्य असलेल्या बोऊकमाल भागाला लक्ष्य करून हल्ला चढवला होता. ही विमाने कोणाची हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र या हल्ल्यात दहशतवादी गटांच्या शस्त्र्ाागार आणि वाहनांनाच लक्ष्य करण्यात आले होते, असेही संघटनेच्या सदस्यांनी स्पष्ट केले. या हल्ल्यांबाबत सिरीया किंवा इराकने काहीच स्पष्टीकरण दिलेले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या