उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजप आमदार कुलदीपसिंह सेंगर दोषी

2238

उन्नाव अपहरण व बलात्कार प्रकरणी दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाने भाजप आमदार कुलदीपसिंह सेंगरला दोषी ठरवले आहे. सोमवारी या प्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने सेंगर यांना दोषी ठरवेल असून 19 डिसेंबरला शिक्षेची सुनावणी होणार आहे.

कुलदीपसिंह सेंगर याच्यासह न्यायालयाने महिला आरोपी शशी सिंह हिलाही दोषी ठरवले आहे. शशी सिंहने पीडितेला सेंगर यांच्याकडे नेले होते. तिथे सेंगरने पीडितेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. तीस हजारी न्यायालयाने कुलदीपसिंह सेंगर आणि शशी सिंहला कलम 120 बी, 363, 366, 376 आणि पॉस्को कायद्यान्वये दोषी ठरवले आहे.

पीडितेने स्वत:चा आणि कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी उशिराने केस दाखल केली. पीडितेच्या मनाची अवस्था आम्हाला समजते, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच सामूहिक बलात्कारासारख्या प्रकरणात सीबीआयला चार्जशीट दाखल करण्यासाठी एक वर्ष का लागला? असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला आहे.

आणखी एका खटल्यावरील निर्णय बाकी
या प्रकरणी न्यायालयात एकून 5 एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. यातीत एकाने न्यायायलाने आपला निर्णय दिला आहे. अन्य खटल्यांची सुनावणी न्यायालयात सुरू आहे. यात पीडितेच्या वडिलांचा कस्टडीमध्ये झालेला मृत्यू, रस्ते अपघातामध्ये पीडितेच्या कुटुंबातील दोन महिलांचा मृत्यू, पीडितेसोबत सामूहिक बलात्कार आणि तिच्या काकांना कथित रुपाने खोटा खटला दाखल करण्याचा समावेश आहे.

काय आहे प्रकरण?
4 जून 2017 रोजी पीडित मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. यानंतर तिच्या वडिलांचा कोठडीत मृत्यू झाला. 13 एप्रिल 2018 ला आमदाराला अटक करण्यात आली आणइ सीबीआयकडून चौकशी झाली. त्यानंतर कारच्या अपघातात संशयास्पदरीत्या तिच्या दोन नातेवाइकांचा मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या