
‘लजावल इश्क’ हा एक नवीन पाकिस्तानी डेटिंग शो अद्याप प्रदर्शित झालेला नसला तरी वादाला तोंड फोडत आहे. हा शो 29 सप्टेंबर रोजी यूटय़ूबवर प्रदर्शित होईल. या शोमध्ये चार पुरुष आणि चार महिला तुर्कीतील इस्तंबूलमधील एका आलिशान व्हिलामध्ये एकत्र राहतील, जिथे त्यांची प्रत्येक हालचाल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली जाईल.