पोलिसाच्या गोळीबारात अॅपलच्या मॅनेजरचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लखनौ

उत्तर प्रदेशमधील लखनौमध्ये पोलिसाने केलेल्या गोळीबारात अॅपल कंपनीच्या विभागीय व्यवस्थापकाचा मृत्यू झाला आहे. विवेक तिवारी असे त्याचे नाव आहे. विवेक आपल्या एका महिला सहकाऱ्यासोबत गाडीमधून घरी जात होते. त्याचवेळी एका पोलीस हवालदाराने त्यांना गाडी थांबवण्याचा इशारा केला. पण विवेक यांनी त्याकडे दुर्लक्ष करत गाडी सुसाट पळवली. यामुळे संशयित समजून हवालदाराने गाडीवर गोळीबार केला. यात विवेक यांना गोळी लागली. तर त्यांच्यासोबत असलेली महिलाही जखमी झाली आहे. त्यानंतर विवेक यांना रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, या घटनेनंतर उत्तर प्रदेश पोलीस अडचणीत आले आहेत. विवेक यांची पत्नी कल्पनाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याप्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली आहे. तसेच पोलिसांना माझ्या पतीवर गोळीबार करण्याचा काहीही अधिकार नव्हता. यामुळे न्याय मिळेपर्यंत विवेक यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास कल्पना यांनी नकार दिला आहे.

तर दुसरीकडे ज्या हवालदाराने विवेक यांच्यावर गोळीबार केला, त्याने विवेक व महिला आक्षेपार्ह स्थितीत होते. गाडी थांबवण्याचा इशारा देऊनही त्यांनी गाडी सुसाट पळवली. यामुळे ते संशयित असल्याचे वाटल्याने गाडीवर गोळीबार केल्याचे म्हटले आहे.