
उत्तर प्रदेशातील विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण (SIR) ची मसुदा यादी प्रसिद्ध झाली आहे. या मसुदा यादीत तब्बल २.८९ कोटी नावे वगळण्यात आल्यामुळे भाजपची चिंता वाढली आहे. त्यामुळे भाजपने आमदार आणि खासदारांना मतदार यादी दुरुस्तीकडे पूर्ण लक्ष देण्यास सांगितले आहे. उत्तर प्रदेशातील SIR चा भाग म्हणून मसुदा मतदार यादी प्रसिद्ध केल्याने राजकीय हालचाली वाढल्या आहेत. राज्यातील मतदार यादीतून सुमारे २.८९ कोटी नावे वगळण्यात आल्यानंतर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची चिंता वाढली आहे.
लाखो मतांचे नुकसान ही एक मोठी संख्या आहे आणि ती गांभीर्याने घ्यावे लागेल. मुख्यमंत्र्यांनी नवीन कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या देण्याचे आणि पुढील महिन्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. मोठ्या संख्येने मतदार यादीतील मतदार वगळण्याबद्दल भाजपने चिंता व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, लखनौ, कानपूर, गाझियाबाद, मेरठ, आग्रा, प्रयागराज आणि गौतम बुद्ध नगरसारख्या प्रमुख शहरांमध्ये २० ते ३० टक्के मतदार कमी झाले आहेत.


























































