योगींच्या उत्तरप्रदेशमध्ये गुन्हेगारी कमी होण्याची कोणतीही चिन्ह दिसतं नाहीत. रोज नवनवीन आणि भयानक गुन्हे उत्तर प्रदेशात घडत आहेत. दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. अशातच एका माथेफिरूने एका वर्षात आणि एकाच पॅटर्नमध्ये 10 महिलांची हत्या केल्याने खळबळ उडाली होती. अखेर आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यामध्ये हा भयानक प्रकार घडला आहे. आरोपीचे नाव कुलदीप असून त्याने मागील 15 महिन्यांमध्ये 10 महिलांची हत्या केली आहे. ज्या महिलांची हत्या करण्यात आली त्यांचे वय हे 45 ते 55 च्या आसपास आहे. तसेच आरोपीने सर्व महिलांची हत्या 20 ते 25 मीटरच्या परिसरामध्ये आणि एकाच पॅटर्नमध्ये केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलदीप कौटुंबीक वादांमुळे महिलांचा तिरस्कार करू लागला. यामुळेच जर एखाध्या महिलेने त्याला विरोध केला तर तो गळा दाबून त्यांची हत्या करत होता. अशा प्रकारे त्याने एकूण 10 महिलांची गळा दाबून हत्या केली. पोलीस अधिकारी अनुराग आर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, लहाण असताना कुलदीपचे वडील बाबूराम यांनी दुसरे लग्न केले होते. सावत्र बायकोच्या सांगण्यावरून बाबुराम कुलदीपच्या आईला बेदम मारहाण करत असे. त्यामुळे महिलांविषयी त्याच्या मनात चिढ निर्माण झाली. तसेच त्याची पत्नी सुद्धा त्याला सोडून गेली होती. त्यामुळे तो शेतामध्ये एखादी महिला एकटी दिसली की, शारीरिक संबंधांची मागणी करत असे. महिलेने नकार दिल्यास तो त्यांची गळा दाबून हत्या करत होता. तसेच त्याने सर्व हत्या ऊसाच्या शेतामध्ये केल्याची कबुल केले आहे. आरोपी कुलदीपने एकूण 10 हत्या केल्या आहेत. त्यातील 6 हत्या केल्याचे त्याने कबुल केले आहे. पुढील तपास पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे.