..ही तर लोकशाहीची हत्या -मायावती

21
mayawati

सामना ऑनलाईन। लखनौ

निवडणूक आयोगाने मला प्रचारापासून दूर ठेवून एकप्रकारे लोकशाहीची हत्याच केली आहे. निवडणूक प्रचार करण्याचा मला घटनेने अधिकार दिला आहे. पण आयोगाने तो नाकारला आहे, हे लोकशाहीला मारक आहे, अशा शब्दांत बसपा अध्यक्षा मायावती यांनी सोमवारी निवडणूक आयोगावर टीका केली.

देशाच्या निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना निवडणूक आयोगाने मोकळीक दिली आहे. पण मी धार्मिक तेढ निर्माण होईल असे कोणतेही वक्तव्य केलेले नसताना माझ्यावर दोन दिवसांसाठी प्रचारबंदी कशाच्या अधारे घातली, असा सवालही त्यांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या