उत्तर प्रदेशात आयएसआय एजंटला अटक, चौकशीत धक्कादायक माहिती उघड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लखनौ

हिंदुस्थानातील सैनिकी तळांचा महिती, महत्वाचे नकाशे आणि गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवणाऱ्या एका आयएसआय एजंटच्या उत्तर प्रदेश पोलिसांनी बुलंदशहर येथून मुसक्या आवळल्या आहेत. मोहम्मद जाहिद असे या एजंटचे नाव असून त्याच्याकडून संशयास्पद दस्तावेज, मेरठमधील सैन्याच्या तळांचे नकाशे, आधार कार्ड, मोबाईल, मतदान कार्ड तसेच इतर साहित्य जप्त केले आहे. सध्या या एजंटची उत्तर प्रदेश एटीएस आणि आयबीकडून चौकशी सुरू आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केलेला जाहिद हा गेल्या पाच वर्षांपासून देशातील संरक्षण विषयक गोपनीय माहिती, नकाशे, फोटो पाकिस्तानातील आयएसआयचा कमांडर अलीला पाठवत होता. तसेच तो अलीबरोबर फोनवरून देखील संपर्कात होता. जाहिदच्या दोन मावशी कराचीमध्ये राहत असून तो पहिल्यांदा 2012 मध्ये आणि नंतर 2014 मध्ये पाकिस्तानला गेला होता. पहिल्या फेरीतच तो आयएसआयच्या संपर्कात आला होता, तेव्हापासून त्याने हेरगिरी सुरू केली होती.