
उत्तर प्रदेशातील फतेहपूरमध्ये दोन मालगाड्यांची समोरासमोर धडक झाल्याची घटना घडली. या अपघातात एका मालगाडीचे इंजिन आणि गार्डचा डबा रुळावरून खाली घसरला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मोटरमन आणि को-पायलट जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या अपघातातमुळे अप मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.
खागा कोतवाली क्षेत्रातील पाम्भीपूरमध्ये एक मालगाडी सिग्नल न मिळाल्याने उभी होती. यावेळी त्याच ट्रॅकवर आलेल्या दुसऱ्या मालगाडीने तिला धडक दिली. धडक दिल्यानंतर एका मालगाडीचा गार्डचा डबा आणि इंजिन रुळावरून उतरला. रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.





























































