अद्ययावत ‘अक्षर’ने वाढवले तटरक्षक दलाचे सामर्थ्य

हिंदुस्थानचे सागरी सामर्थ्य दिवसागणिक वाढत आहे. तटरक्षक दलाच्या ताफ्यात ‘अक्षर’ ही दुसरी मोठी गस्तीनौका दाखल झाली आहे. गोवा शिपयार्ड लिमिटेडने स्वदेशी पद्धतीने बनवलेली ही नौका 51 मीटर लांब आहे. या नौकेतील 60 टक्क्यांपेक्षा जास्त सामुग्री स्वदेशी बनावटीची आहे. 3 हजार किलोवॅट इंजिन क्षमतेच्या अक्षर नौकेचा कमाल वेग ताशी 27 नॉट्स इतका आहे. या नौकेवर 30 मिमी सीआरएन 91 गन आणि दोन 12.7 मिमी स्टॅबिलाईज्ड रिमोट नियंत्रित गन आहेत. अद्ययावत प्रणालींनी सज्ज असलेली ही नौका सध्या पुद्दुचेरी येथील कराईकल येथील समुद्रात तैनात करण्यात आली आहे.