#UpscExamResult – साताऱ्याचा प्रसाद चौगुले राज्यात प्रथम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून सातारा येथील प्रसाद चौगुले याने या परीक्षेत राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे, तर मुलींमधून मानसी पाटील ही प्रथम आली आहे.

दोन वर्षांपूर्वी एकूण 420 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. ज्यामध्ये उपजिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, पोलीस उपअधीक्षक अशा वेगवेगळय़ा 26 पदांचा यामध्ये समावेश होता. रोहन कुंकर हा मागासवर्गीयांमध्ये पहिला आणि राज्यात तिसरा आला आहे. रवींद्र शेळके हा परीक्षार्थी दुसऱया क्रमांकाने उत्तीर्ण झाला असून दादासाहेब दराडे याने चौथा क्रमांक पटकावला आहे.