
पनवेल तालुका बांग्लादेशी घुसखोरांनी पोखरल्याचे स्पष्ट होत असतानाच उरण तालुक्यातही अनेक बांग्लादेशी घुसखोरांना आपले बस्तान बसविले असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. स्वतःची आणि राज्यांची नावे बदलून हे घुसखोर उरण तालुक्यात बिनबोभाटपणे वास्तव्य करीत आहेत.मात्र या घुसखोरांची माहिती स्थानिक रहिवासी उघड करीत नसल्याने त्यांना शोधण्याचे कठीण आव्हान उरण पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
उरण तालुक्यात औद्योगिक प्रगती मोठ्या प्रमाणात होत आहे. जेएनपीटी, ओ एन जी सी, भारत पेट्रोकेमिकल्स, वायू विद्युत निर्मिती प्रकल्प तसेच नौदल शस्त्रागार यांसारखे संवेदनशील प्रकल्प उरण तालुक्यात आहेत. या विभागात रोजगाराच्या मोठ्या संधी असल्याने उरण तालुक्याच्या गावागावात सध्या परप्रांतीय भाडोत्री मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. मिळेल ते काम करण्यास तयार असणाऱ्या या परप्रांतीयांनि उरण तालुक्यात चांगलेच बस्तान बसविले आहे.
सध्या या परप्रांतीयांनी स्थानिकांच्या रोजगारावर डल्ला मारला असून गावातील दुकाने, टेलरिंग व्यवसाय, भाजीपाल्याची दुकाने,टायर पंक्चर व गाड्या दुरुस्तीची दुकाने यावर परप्रांतीयांचे वर्चस्व असल्याचे दिसून येते.या परप्रांतीयांनी आपला धर्म जात बदलून संजय,राजू,गणेश अशी नावे धारण करून आपला पसारा वाढबिला आहे.विशेष म्हणजे ते जेव्हा त्यांच्या जातभाईंशी बोलताना ‘सलाम आलेकुम’ने सुरुवात करतात तेव्हा हे नक्की कोण असा सवाल उपस्थित होतो.
उरण तालुक्यातील रस्त्यावरच्या मोक्याच्या जागी अनेक भंगारवाल्यांची गोदामे आहेत.हे बहूतेक भंगारवाले मुस्लिम असून त्यांच्याकडे भंगार गोळा करणाऱ्यांची माहिती ते स्थानिक ग्रामपंचायत किंवा पोलीस यंत्रणेला देत नसल्याने त्याच्या अस्तित्वामुळे संशयाचे वातावरण निर्माण होत आहे.त्याचप्रमाणे जेएनपीटी बंदरात कार्यरत अवजड वाहनांवरील ड्राइव्हर अनेक गावांमध्ये भाडोत्री म्हणून राहत आहेत. विशेष म्हणजे आपले भाडोत्री निघून जाऊ नये व आपले नुकसान होऊ नये म्हणून स्थानिक जनताही या परप्रांतीयांचे वास्तव्य लपवित असल्याने दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वी इसिस या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ खोपटे पुलाच्या पिलरवर मजकूर लिहिणाऱ्याएका इसमास उरण पोलिसांनी खोपटे गावातून अटक केली होती.असे कितीतरी दहशतवादी वृत्तीचे घुसखोर उरण तालुक्याच्या गावागावात असण्याची दाट शक्यता आहे.पनवेल तालुका बांग्लादेशी घुसखोरांनी पोखरला असला तरी उरण तालुक्यातही या घुसखोरांनी आपले हातपाय पसरले आहेत.उरण शहरात असलेली मुस्लिम वस्ती लक्षात घेता दर शुक्रवारी नमाजासाठी उरण शहरात मुस्लिमांची होणारी गर्दी पहाता घुसखोर उरणमध्ये किती नियोजितपणे वास्तव्य करतात याची कल्पना येईल.उरण पोलीस यंत्रणा जागरूक असली तरी गावागावातील बिळांमध्ये लपून बसलेले हे बांगलादेशी घुसखोर शोधून काढण्याचे उरण पोलिसांना आव्हानात्मक ठरणार आहे.त्यासाठी पोलीस यंत्रणेने शोधमोहीम घेण्याची मागणी जनतेतून होत आहे.
























































