चारशे जणांना तीन कोटींचा गंडा; आरोपीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

उरण तालुक्यातील 400 जणांना तीन कोटी रूपयांचा गंडा घालून पाच वर्षांपासून फरार असलेल्या रमेश पेडणेकर याला उरण पोलिसांनी अटक केली आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पेडणेकर ज्वेलर्सच्या नावाने सुवर्ण योजना, नविन दागिने बनविण्यासाठी घेतलेली बयाणा रक्कम, गहाण ठेवलेले दागिने आणि विविध व्यक्ती आणि बँकांकडून घेतलेले कर्ज थकवून रमेश पेडणेकर पळून गेला होता. उरण पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात फसवणूकीचे आणि इतर दोन गुन्हे दाखल होते. त्याच्यावर फसवणूकीचे विविध ठिकाणी 49 गुन्हे दाखल आहेत. रमेश पेडणेकरची संपत्ती विकून ग्राहकांचे पैसे परत करावे या मागणीसाठी ग्राहकांनी उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक वेळा आंदोलने केली होती. यापूर्वी दोन वेळा रमेश पेडणेकरला अटक देखिल झाली होती. बँक ऑफ महाराष्ट्रने त्याच्या दुकानाची जप्ती देखिल केली होती. मात्र ग्राहकांना पैसे परत द्यायला नको म्हणून तो लपून रहात होता. मागील पाच वर्षापासून तो फरार होता. न्यायालयाने देखिल त्याला पकडण्याचे आदेश दिले होते. उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक जगदिश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक शिवाजी काठे यांनी शनिवार पेडणेकर याला पकडले आणि अटक केली. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. उरण पोलिसांच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.