उरणमध्ये तरुणांचे जन-आक्रोश आंदोलन

958

गेल्या वर्षभरापासून वाहतूक कोंडीच्या समस्येने त्रस्त असलेल्या उरणवासियांच्या सहनशक्तीचा अंत झाला आहे. याबद्दल वारंवार तक्रार करुनही सरकार दरबारी कोणी याची दखल घेत नसल्याने येथील तरूणांनी जन आक्रोश आंदोलन सुरू केले आहे.

त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी धडाधड उपाययोजना सुरू केल्या. आज देखिल तरुणांनी जन आक्रोश आंदोलनाच्या नावाने रस्त्यावर उतरून आपली ताकद दाखवून दिली. काळे कपडे परिधान करून हजारो तरूण बुधवारी रस्त्यावर उतरले होते.

उरण ते नवी मुंबई , उरण ते पनवेल या 40 ते 50 मिनिटांच्या प्रवासाला 4 ते 5 तास लागतात. यास कारण म्हणजे इथल्या जेएनपीटीची अवजड वाहतूक , रस्त्यावरची बेकायदेशीर पार्किंग आणि रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्याच्या निषेधार्थ 9 आक्टोबरला करळ फाटा येथे जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलना आधीच आंदोलनकर्त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या. उरण तालुक्यातील करळफाटा ते नवीमुंबई येथील मुंबई – पनवेल महामार्गाला जोडणाऱ्या उरणफाट्यापर्यंत सकाळी 8 ते 11 व सायंकाळी 5 ते 8 या वेळेत अवजड कंटेनर ट्रेलर वाहतुकीस बंदी करण्यात आली तर वाहतूक कोंडीला कारणीभूत असलेला पाडेघर येथील अनधिकृत कट कायमचा बंद करण्यात आला आहे. रस्त्यामध्ये अनधिकृत पणे अवजड वाहने उभी करून नयेत यासाठी मागील हप्ताभरात 3 हजार केसेस करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उरणच्या तरूणांच्या आंदोलनाला मिळालेले हे मोठे यश मानण्यात येते.

आपली प्रतिक्रिया द्या