
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी 7 देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. यात माली, दक्षिण सुदान, सिरीया, नायगर, बुर्कीन फासो, लाओस आणि सिएरा लिओन या देशांचा यात समावेश आहे. ही बंदी 1 जानेवारी पासून लागू होणार आहे.
या आधी अमेरिकेने 12 देशांवर बंदी घातली होती. त्यात अफगाणिस्तान, म्यानमार, चाड, कांगो, इक्वेटोरियन गिनी, इरिट्रिया, हैती, इराण, लिबिया, सोमालिया, सुडान आणि येमेन या देशांचा समावेश होता. अशा प्रकारे आता अमेरिकेने एकूण 19 देशांवर पूर्णत: प्रवेश बंदी घातली आहे.
अमेरिकेने आणखी 15 देशांच्या नागरिकांवर अंशत: बंदी घातली आहे. त्यात अंगोला, अँटीग्वा, बारबुडा, बेनीन, सेट डी लवोयर, डोमिनिका, गॅबॉन, द गांबिया, मालावी, मॉरिटानिया, नायजेरिया, सेनेगल, टांझानिया, टोंगा, झांबिया आणि झिम्बाब्वे या देशांवर अंशत: बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.































































