अमेरिकेत पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत, पाकड्यांचा जळफळाट

2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत पोहचले असून ह्यूस्टन येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. ‘हाऊडी मोदी’ या कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी आलेल्या मोदींसाठी यावेळी रेड कार्पेट अंथरण्यात आला होता. तर दुसरीकडे आर्थिक मदत मागण्यासाठी अमेरिकेत गेलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना मात्र कोणीही विचारले नाही. त्यांच्या स्वागताला एकही अमेरिकन अधिकारी गेला नाही. यामुळे पाकिस्तानच्या पत्रकारांबरोबरच तेथील नागरिकांचाही जळफळाट झाला असून त्यांनी खान यांना ट्रोल केले आहे.

“हाऊडी मोदी” या कार्यक्रमासाठी मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. रविवारी सकाळी त्यांचे ह्यूस्टन येथे पोहोचताच विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी अमेरिकन सरकारमधील अनेक बडे अधिकारीही उपस्थित होते. पण जवळजवळ त्याच वेळेस अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे मदत मागण्यासठी आलेल्या इमरान खान यांच्याकडे कोणीही ढुंकून पाहिले नाही. त्यांच्या स्वागतासाठी एकही अमेरिकी अधिकारी किंवा सरकारमधील कर्मचारीही तेथे हजर नव्हता. फक्त अमेरिकेत राहणारे पाकिस्तानी नागरिक व काही पाकिस्तानी अधिकारी खान यांच्या स्वागतासाठी विमानतळावर आले होते. ते पाहून खान यांची निराशा झाली. पण त्यांच्यापेक्षाही पाकिस्तानी पत्रकार अधिक दुखावले. त्यातील पाकिस्तानी महिला पत्रकार नायला इनायत हिने एक टि्वटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्या स्वागतात दुजाभाव का असा प्रश्न नायलाने विचारला आहे. तर दुसरीकडे मोदी यांनी कश्मिरी पंडितांचीही भेट घेतली.

या व्हिडीओमध्ये इमरान खान यांच्या स्वागतासाठी एकही अमेरिकी अधिकारी उपस्थित नसल्याचे दिसत आहे. यावर अनेक युजर्सने खान यांचे मीम्स बनवले आहेत. यात काहींनी मंदीसाठी खान जबाबदार असल्याचे दाखवले आहे. तर काहींनी खान हे मोदींच्या हाऊडी मोदी कार्यक्रमात गपचूप गेल्याचे दाखवले आहे. तर एकाने खान दुसऱ्यांकडे मदतीची भीक मागत असल्याचे दाखवले आहे. तर काहींनी अमेरिकेने ठार केलेल्या दहशतवादी ओसामा बिन लादेनचा फोटो पोस्ट केला आहे. त्यावर पाकिस्तान खूपच शांतताप्रिय देश असून मी येथे शांतता अनुभवल्याचे मीम्स केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या