ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे जीडीपीत 0.5 टक्के घट, मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरम यांचा इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या 50 टक्के टॅरिफमुळे हिंदुस्थानची जीडीपी वाढ 0.5 टक्के कमी होईल, असे वक्तव्य देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी केले. टॅरिफमुळे यंदाच्या आर्थिक वर्षात जीडीपी वाढीत 0.5 टक्के ते 0.6 टक्के घट होईल. मात्र जर टॅरिफ जास्त काळ लागू झाले तर त्याचा मोठा परिणाम होईल. त्यामुळे हिंदुस्थानसाठी धोका निर्माण होईल, असा इशारा नागेश्वरन यांनी दिला.

हिंदुस्थानातून अमेरिकेत पाठवल्या जाणाऱ्या मालावर 27 ऑगस्टपासून 50 टक्के टॅरिफ लागू झाले आहे. ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हच्या अहवालानुसार, नवीन टॅरिफ हिंदुस्थानातील सुमारे 54. लाख कोटी रुपयांच्या निर्यातीवर परिणाम करेल. 50 टक्के टॅरिफमुळे अमेरिकेत विकले जाणारे कपडे, जेन्म-ज्वेलरी, फर्निचर, सीफूड यासारखे हिंदुस्थानी उत्पादने महाग होतील. त्यांच्या मागणीत 70 टक्के कमी येऊ शकते.

पहिल्या तिमाहीत हिंदुस्थानची जीडीपी वाढ चांगली

2025-26 च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून )हिंदुस्थानचा जीडीपी वार्षिक तुलनेत 6.5 टक्क्यांवरून 7.8 टक्के झाला आहे. मागील 5 तिमाहींपेक्षा हा जास्त आहे. मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिस आणि ऑग्रिकल्चर सेक्टरमधील चांगल्या कामगिरीमुळे जीडीपी वाढला. 6 ऑगस्ट रोजीच्या मॉनिटरिंग पॉलिसी मीटिंगमध्ये आरबीआयने आर्थिक वर्ष 2026 साठी जीडीपी वाढीचा दर 6.5 टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केलेला आहे.