
अमेरिका आणि पाकिस्तान या दोन देशांत करार झाला असून या कराराच्या माध्यमातून अमेरिका पाकिस्तानला एआयएम-120 प्रगत मध्यम-श्रेणीची हवेतून हवेत मारा करणारी एएमआरएएएम क्षेपणास्त्रे पुरवणार आहे, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर अमेरिकेने तातडीने एक प्रेस नोट जारी करून यासंबंधीचे वृत्त खोटे असून अमेरिका पाकिस्तानला घातक क्षेपणास्त्रे देणार नाही, असे स्पष्टीकरण तातडीने दिले आहे. अमेरिकेच्या या स्पष्टीकरणानंतर पाकिस्तानच्या स्वप्नावर पाणी फिरले आहे.
AIM -120 AMRAAM हे हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. जे लांब पल्ल्याच्या शत्रूच्या विमानांना लक्ष्य करण्यास सक्षम आहे, हे अमेरिका पाकिस्तानला देणार आहे, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते, परंतु अमेरिकेच्या दूतावासाने या सर्व अफवा आहेत, असे म्हटले आहे.
काय म्हटले अमेरिकी दूतावासाने
अमेरिकी दूतावासाने म्हटले की, अमेरिका दूतावास आणि हिंदुस्थान येथील कॉन्सुलेट्स यांनी स्पष्ट केले आहे की, 30 सप्टेंबर 2025 ला वॉर डिपार्टमेंटने स्टँडर्ड कॉन्ट्रक्टने घोषणा केली की, जे अनेक देशांसाठी आधीच उपलब्ध फॉरेन मिलिट्री सेल्स कॉन्ट्रक्टमध्ये संशोधन दर्शवते. ज्यात पाकिस्तानचाही समावेश असल्याचे दाखवतो. यासंदर्भात कॉन्ट्रक्ट संशोधनाचा कोणताही भाग पाकिस्तानला नवीन AMRAAM क्षेपणास्त्राची डिलिव्हरी करण्याचा नाही. हे समर्थन केवळ जुन्या सिस्टमची देखभाल करणे आणि स्पेयर पार्टस्पर्यंत मर्यादित आहे. यात पाकिस्तानच्या सध्याच्या क्षमतांच्या कोणत्याही अपग्रेडचा समावेश करण्यात आला नाही.