
– दालचिनीमधील अँटीबॅक्टेरिअल गुणधर्म असतात. ते तुम्हाला बॅक्टेरियापासून दूर ठेवतात.
– मधुमेहींसाठी दालचिनी गुणकारी मानले जाते. दालचिनीमुळे शरीरातील रक्त शर्परा आणि इन्सुलिनचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दालचिनीचे सेवन केल्यास मधुमेहाचा त्रास कमी होऊ शकेल.
– सांधेदुखीचा त्रास होत असल्यास त्यावर दालचिनी चांगला पर्याय आहे. गरम पाण्यात दालचिनी पावडर आणि मध मिसळून ते मिश्रण प्यायल्याने आराम मिळतो.
– पोटदुखी आणि गॅसची समस्या असल्यास दालचिनी आणि मध एकत्र मिसळून घ्यावे. त्याने फायदा होतो.
– डोपं दुखत असल्यास दालचिनी पाण्यात वाटून डोक्यावर लेप लावावा. आराम मिळतो.
– केसगळतीच्या समस्येने त्रस्त असल्यास ऑलिव्ह ऑइलमध्ये मध आणि दालचिनी एकत्र करून त्याची पेस्ट आंघोळीच्या अर्धा तासआधी केसांच्या मुळाशी लावून ठेवा. नंतर केस स्वच्छ धुवा. यामुळे केसगळती कमी होईल.
– सर्दी झाली असल्यास दालचिनी पावडर पाण्यात उकळून गाळून घ्या. या पाण्यात मध मिसळून प्यायल्यास आराम मिळतो.
– वजन कमी करण्यासाठीही दालचिनी उपयुक्त आहे. त्यासाठी दालचिनी पाण्यात उकळून गाळून घ्यायची. नंतर त्यात लिंबाचा रस आणि मध मिसळून प्या.
– जेवणानंतर दालचिनी, मिरीपूड आणि मध एकत्र करून त्याचे चाटण घेतल्यास पोट फुगत नाही.
– हृदयविकारावर दालचिनी गुणकारी आहे. दालचिनीमुळे रक्त पुरवठा सुरळीत होतो. त्यामुळे दिवसातून एकदा तरी तुमच्या जेवणात दालचिनी असू द्या.
– दालचिनी चहाच्या रोजच्या सेवनाने तुमच्या डोळ्यांचे विकार कमी होतील.




























































