
मोदक आणि गणपती बाप्पा हे न तुटणारं समीकरण आहे. म्हणूनच बाप्पाला नैवेद्यासाठी मोदक हे हमखास दाखवले जातात. मोदक करण्याची प्रत्येकाची पद्धत ही निराळी असते. उकडीचे मोदक हे केल्यानंतर फार तर दोन दिवस टिकतात. परंतु काही ठराविक टिप्स वापरून केलेले तळणीचे मोदक हे दहा दिवस आरामात टिकतात.
गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक
साहित्य : पारीसाठी :
मीठ – चिमूटभर
तूप – २ टेबलस्पून
पाणी – गरजेप्रमाणे
गव्हाचे पीठ – १ कप
रवा – ½ कप
गणपती बाप्पा मोरया 2025 – लहानांच्या आवडीचे चॉकलेट मोदक करण्यासाठी लागेल फक्त अर्धा तास
सारणासाठी :
रवा – ½ कप
पिठी साखर – ३/४ कप
सुकं खोबरे – १ कप
तूप – आवश्यकतेनुसार
खसखस
सुकामेवा
वेलची पावडर
कृती :
सर्वात आधी गव्हाचं पीठ, रवा, तूप आणि मीठ घालून पाणी टाकून घट्ट पीठ मळून घ्यावे.
सारणासाठी रवा, खसखस, सुकं खोबरे आणि सुकामेवा तुपात खरपूस भाजून घ्यावा.
भाजून झाल्यानंतर हे मिश्रण थंड झाल्यावर, त्यात पिठी साखर व वेलची पावडर घालून सारण तयार करा.
मळलेल्या पिठाच्या लहान लहान पोळ्या लाटून त्यात सारण भरून मोदकाचे आकार द्या.
गरम तेलात मंद आचेवर तळून घ्या.
मोदक हे मंद आचेवर तळावेत, म्हणजे ते अधिक काळ टिकतात.
अशा पद्धतीने मोदक केल्यास, हमखास 10 दिवस टिकतील.