इंटरनेटशिवाय वापरा व्हॉट्सअॅप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुम्ही डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप वापरत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. अनेकदा डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप वापरत असताना मोबाईल नेटवर्क जाते किंवा मध्येच फोनची चार्जिंग संपते. त्यामुळे मेसेजची देवाणघेवाण होण्यास अडथळा निर्माण होतो. मात्र, आता कंपनीने व्हॉट्सअॅप बिटा ही सेवा सुरू केली आहे. नव्या अपडेटमुळे युजर मोबाईलमध्ये इंटरनेट नसतानाही व्हॉट्सअॅप वेबचा वापर कोणत्याही अडथळ्याशिवाय करू शकतात.