नागरिकांनी समस्या मांडताच भाजप मंत्र्याचा ‘जय श्रीराम’चा नारा

उत्तर प्रदेशचे ऊर्जामंत्री ए. के. शर्मा सध्या भलेतच अडचणीत आले आहेत. त्यांच्या बेजबाबदार वागण्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय. काही लोकांनी त्यांच्यासमोर विजेची समस्या मांडल्यानंतर ए. के. शर्मा चक्क हात जोडतात आणि  ‘जय श्रीराम’, ‘जय हनुमान’ अशा घोषणा देत जयजयकार करत निघून जातात, असा हा व्हिडीओ आहे. शर्मा यांच्या वागण्यावर आता चांगलीच टीका होत आहे. आमच्याकडे 24 तासांपैकी केवळ 3 तासच वीज येते. अधिकारीही ऐकून घेत नाहीत, आता तुम्हीच काही तरी करा, अशी विनंती उपस्थितांपैकी काहींनी मंत्र्यांकडे केली. त्यावर मंत्रिमहोदयांनी हात जोडून लक्ष घालतो, पाहूया असे म्हटले त्यानंतर ‘जय श्रीराम’, ‘जय हनुमान’ अशा घोषणा देत ते पुढे रवाना झाले.