पत्नी रात्री ‘नागिण’ होऊन घाबरवते, पतीने अजब दावा करत सीतापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली मदत

उत्तर प्रदेशातून एक अनोखी बातमी समोर आली आहे. सार्वजनिक तक्रार निवारण दिवशी 4 ऑक्टोबर रोजी सीतापूरच्या महमूदाबाद जिल्ह्याधिकाऱ्यांकडे एक अजब तक्रार समोर आली आहे. ज्यामध्ये तक्रारदाराने आपली पत्नी रात्री नागिण बनून घाबरवत असल्याचा आरोप केला आहे. तक्रारीत त्याने ती मानसिक रुग्ण असून तिच्यावर कारवाईची मागणी केली आहे. त्याची ही अजब तक्रार ऐकून अधिकाऱ्यांनी पोलीस तपास करुन त्याचे निवारण करण्याचे आदेश दिले आहेत.

हे प्रकरण सीतापूर जिल्ह्यातील महमूदाबाद तहसील येथील आहे. शनिवारी तक्रार निवारण दिवसानिमित्त जिल्हास्तरीय अधिकारी सर्वसामान्य जनतेच्या तक्रारींचे निवारण करत होते. त्या दरम्यान तिथे आलेल्या एका व्यक्तीने त्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली आणि सर्वच थक्क झाले. त्याने आपली पत्नी रात्री नागिण होऊन घाबरवत असल्याचे सांगितले. मेराज असे तक्रारदाराचे नाव असून तो महमूदाबाद तहसीलमधील लोढासा गावातील आहे. मेराज यांचा विवाह राजपुर येथील नसीमुन हिच्याशी झाला होता. शनिवारी त्यांनी जिल्हाधिकारी अभिषेक यांच्यासमोर आपल्या पत्नीची कैफीयत मांडली. ते म्हणाले माझी पत्नी मानसिक रुग्ण असून ती त्याला रात्री नागिण बनून घाबरवते. त्यामुळे त्याला झोपताही येत नाहीय. तसेच तिच्या आई-वडिलांना ही गोष्ट माहित असेल तरी त्यांनी तिच्याशी लग्न लावून माझे आयुष्य उद्धस्त केले आहे. यावेळी तक्रारदाराची ही तक्रार ऐकून अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.