पुड्डुचेरीत हिंदी भाषेची बळजबरी नको

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आमच्यावर हिंदी भाषा लादण्याची बळजबरी आम्ही कदापिही सहन करणार नाही.राज्यात आमची मातृभाषा तमिळचे महत्व कायम राखण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही ,अशी गर्जना करीत केंद्रशासित पुड्डुचेरीचे मुख्यमंत्री व्ही .नारायणसामी यांनी केंद्र सरकारला ईशाराच दिला.  तमिळ संत आणि कवी थिरुवल्लूर यांच्या पुतळ्याचे अनावरण पुडुचेरीच्या राजधानीत मंगळवारी नारायणसामी यांच्या हस्ते झाले.त्यानंतर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले ,केंद्राने दिल्लीत आयोजिलेल्या राज्यांच्या शिक्षण मंत्र्यांच्या राष्ट्रीय बैठकीत आम्ही आमचा द्विभाषिक फॉर्मुला स्पष्ट केला आहे.