स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 1194 पदांची भरती

स्टेट बँक ऑफ इंडियाने समवर्ती लेखापरीक्षक पदासाठी भरती सुरू केली आहे. या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील 1194 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया 18 फेब्रुवारीपासून सुरू झाली असून 15 मार्च 2025 पर्यंत शेवटची डेडलाईन आहे. या भरतीपैकी मुंबईत 16 पदे, अमरावतीत 77 पदे आणि महाराष्ट्र राज्यातील इतर भागांत 91 पदे भरली जाणार आहेत.