पालिका आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी त्यांना मंजूर केलेली सुट्टी स्वतःहून रद्द केली आहे.
मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी हे अमेरिकेत मुलाच्या पदवीदान समारंभाला उपस्थित राहण्यासाठी जाणार होते. त्यासाठी त्यांना राज्य सरकारकडून 9 दिवसांची सुट्टीही मंजूर करण्यात आली होती. या कालावधीत त्यांचे कामकाज अतिरिक्त महापालिका आयुक्त विपिन शर्मा सांभाळणार होते, मात्र दोन्ही देशांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर, भूषण गगराणी यांनी आपली सुट्टी स्वतःहून रद्द केली. दरम्यान, पालिकेतील सनदी अधिकारी तसेच वरिष्ठ अधिकाऱयांच्या सुट्टय़ा राज्य सरकारने रद्द केल्या आहेत.