कटरा शहरात सन्नाटा; वैष्णोदेवी मंदिरात तुरळक भाविक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी श्राईन बोर्डाने दिवसाला फक्त 15 हजार भाविकांना परवानगी दिली आहे. मात्र सध्या जेमतेम अडीचशे ते 300 भाविक वैष्णोदेवीची यात्रा करत आहेत. त्यामुळे कटरा शहरातील कारभार अद्याप ठप्पच आहे. पूर्वीसारखी वर्दळ नाही. कोरोनामुळे कटरा येथील स्थानिकांचा रोजगार हिरावला गेला आहे. दुकानदार, विक्रेते, घोडेस्वारीवर अवलंबून असणारी कुटुंबे यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे.

जम्मू कश्मीरच्या कटरा शहरातील बसस्टँडजवळ गेल्या 20 वर्षांपासून मख्खन सिंग बांगडय़ा विकतात. दिवसभरात त्यांचा सारा माल संपून जायचा. मात्र कोरोनामुळे परिस्थिती बदललेय. दिवसाला 50-100 रुपयांच्या बांगडय़ाही विकल्या जात नाहीत. मख्खन सिंग गावागावांत फिरतात. मात्र तरीही धंदा होत नाही. लॉकडाऊन उठवण्यात आला असला तरी कटरा बंदच आहे.

मख्खन सिंग हे फक्त उदाहरण आहे. वैष्णोदेवीच्या कटरा शहरात फाईव्ह स्टार हॉटेलपासून छोट्या टपऱया, दुकाने, फेरीवाले आहेत. ते सारेच कोरोनामुळे त्रस्त आहेत. कटराची 90 टक्के अर्थव्यवस्था पर्यटनावर चालते. कोरोनाच्या आधी कटरामध्ये दिवसाला 30 ते 40 हजार पर्यटक येणे ही खूप सामान्य गोष्ट होती. एप्रिल ते जुलै या पिक हंगामात तर पर्यटकांची संख्या महिन्याला 60 हजारांपर्यंत जायची. मात्र आता गेल्या तीन महिन्यांत वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी फक्त 92 हजार भाविकांच्या नोंद झाली आहे. त्यामुळे अनेक फेरीवाले, विव्रेत्यांनी अन्य कामे करायला सुरुवात केली आहे. पुणी मोजमजुरी करू लागलंय तर पुणी पेंटिंगचे काम सुरू केलेय. बरेच जण तर गावी परतले आहेत. घोडेस्वारी करणारेही आपापल्या गावी निघून गेले आहेत.

कोटय़वधींचा सुकामेवा होतोय खराब

जम्मूमधील सुकामेवा (ड्रायफूट) अवघ्या देशभरात प्रसिद्ध आहे. कटरा शहरात माता वैष्णोदेवीचे दर्शन करण्यासाठी येणारे भाविक सुकामेवा खरेदी करतात. मार्चच्या आधीपासूनच स्थानिक दुकानदारांनी मोठय़ा प्रमाणात सुकामेवा भरून ठेवला होता. लॉकडाऊन लागल्यानंतर सर्व माल त्यांनी कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला. आता अनलॉकमध्ये वैष्णोदेवीची यात्रा सुरू झाली असली तरी भाविकांची संख्या खूप कमी आहे. त्यामुळे सुकामेवा विक्रेत्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सर्व माल दुकानात ठेवून खराब झाला आहे. रेल्वे बंद, आंतरराज्य बससेवा बंद असल्याने ज्यांच्याकडे स्वतŠच्या गाडय़ा आहेत, असेच भाविक येऊ शकतात.

रोज एक लाख लोकांचे वास्तव्य असायचे…

कटरा शहराची लोकसंख्या सुमारे 30 हजार आहे. दर दिवशी तिथे 30 ते 40 हजार भाविक येतात. 20 हजार घोडेस्वारीवाले असतात. इतर उद्योग करणारे मिळून साधारण एक लाख लोकांचे वास्तव्य कटरा शहरात असते. सध्या पर्यटक नसल्याने हॉटेल-रेस्टॉरंट बंद आहेत. जी हॉटेल सुरू आहेत, तिथे मालक लोक सेवा देत आहेत. त्यांनी कर्मचाऱयांना सुट्टी दिली आहे.

30 ते 40 घोडे भुकेने मेले

कटरा येथे आतापर्यंत 30 ते 40 घोडे भुकेने मेले आहेत. एका घोडय़ाच्या खाण्यावर दिवसाला 400 ते 500 रुपये खर्च येतो. चणे आणि फळं घोडय़ाला दिली जातात. मात्र गेल्या आठ महिन्यांपासून घोडय़ांना खुराक मिळेनासा झालाय. त्यांची खाण्याची आबाळ झालेय. एप्रिल ते जुलै या काळात तर 15 घोडे- खेचर मरण पावले. लॉकडाऊनमध्ये श्राईन बोर्डाने त्यांना मदत केली होती. मात्र ही मदत पुरेशी नसल्याचे घोडा-खेचर असोसिएशनचे सदस्य सोहन चंद यांनी सांगितले. या धंद्यावर अवलंबून असणारी शेकडो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.