उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईसह उपनगरांमध्ये ठिकठिकाणी सामाजिक, शैक्षणिक उपक्रम आयोजित करण्यात आले. या उपक्रमांमध्ये रक्तदान शिबीर, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, ज्येष्ठांना रेनकोट वाटप, गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूवह्यांचे वाटप मोफत आरोग्य शिबीर यासारखे उपक्रम राबवले. या उपक्रमांना सामाजिक संस्था आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पश्चिम रेल्वे स्थानीय लोकाधिकार समितीतर्फे दादर रेल्वे स्थानक येथे महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. प्रत्येक रक्तदात्याला भेटवस्तू देण्यात आली. यावेळी समितीचे अध्यक्ष रमेश गवळी, सरचिटणीस अरुण दुबे, कार्याध्यक्ष विलास जाधव यांच्यासह अर्जुन धुरी, संतोष चौधरी, प्रदीप तानवडे, रूपेश लाड, अनंत नारकर आदी उपस्थित होते.

 

 

शिवसेना मागाठाणे विधानसभा समन्वयक राजू मुल्ला यांच्या वतीने दहिसरमधील श्री दत्त प्रासादिक भजन मंडळाला हार्मोनियम भेट दिली. माजी आमदार विलास पोतनीस यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. यावेळी अशोक म्हामुणकर, विनायक सामंत, मिलिंद म्हात्रे, प्रवीण राणे, अरुण ताम्हणकर, गिरीश आसोलकर, संकेत परब, स्वप्नील धावरे, परशुराम वारिक, गणेश मेस्त्राr, हितेश सावंत, अनंत साळवी, अभिजीत झोरे, स्वप्नील ठाकूर, प्रथमेश बागवे, प्रवीण सावंत, देवांग ताम्हणकर, नीलेश बाईत आदी उपस्थित होते.

 

 

शिव अवजड वाहतूक चालक सेनेच्या वतीने टॅक्सी-रिक्षाचालकांना मराठी शिकवण्यासाठी विशेष मराठी शिकवणी अभ्यास वर्ग सुरू करण्यात आले आहेत. आरटीओच्या निदर्शनानुसार संघाचे अध्यक्ष संदीप मोरे यांच्या प्रयत्नाने हा उपक्रम शिवसेना शाखा क्र. 140 येथे सुरू आहे. यावेळी उपाध्यक्ष उमर सिद्दिकी, अशोक कांबळे, सुरेश पाटील, प्रज्ञा सकपाळ, श्रद्धा मोहिले, राजश्री डवरी, श्रद्धा म्हापनकर, सुषमा गायकवाड, वनिता बोरगे, अनिता ईनरकर, उषा धनावडे, शाखाप्रमुख इंगळे आदी उपस्थित होते.

 

शिवसेना शाखा क्र. 107 च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विभागप्रमुख रमेश कोरगावकर, विधानसभाप्रमुख नंदिनी सावंत, दिनेश जाधव, नीता मोरे, हेमलता सुकाळे, सुनीता धोंगडे, प्रकाश सावंत, शैलेश पवार, सतीश बंदरकर, संदेश मोढवे, विलास बेंद्रे, यशवंत मोरे, सुनीता मुठे, शैला शिंदे, निर्मला जाधव, ज्योती जाधव, स्वप्नील सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

 

 

शिवसेना भायखळा विधानसभा व शाखा क्रमांक 212 च्या विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, आमदार मनोज जामसुतकर, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, विधानसभा समन्वयक बबन गावकर, चंदना साळुंके, राम सावंत, सोनम जामसुतकर, सूर्यकांत पाटील, विनोद शिर्पे, सोनल सायगावकर, विकास झगडे, हर्षदा वस्ते, राजन गायकर, नाना मसुरकर, रमेश रावल, काका चव्हाण, सलीम शेख, प्रियांका टेमकर उपस्थित होते.

 

 

शिवसेना शाखा क्र. 94 च्या वतीने जैतापूरमधील विविध शाळांतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. शिवसेना नेते-आमदार अॅड. अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली शाखाप्रमुख संदीप शिवलकर यांनी जैतापूर शिवसेना ग्रामपंचायत सदस्य दिवाकर आडविलकर, शाखाप्रमुख अनंत मांजरेकर, आनंद पेडणेकर, संदीप मांजरेकर, गणेश मांजरेकर, महेश घडशी, प्रवीण जोगल, श्रीशा तारकर यांच्या मदतीने उपक्रम पार पडला.