उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईसह राज्यात विविध सामाजिक, सांस्कृतिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आले. रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण अशा उपक्रमांना मोठा प्रतिसाद मिळाला.

जोगेश्वरी पूर्वेतील शिवसेना मेघवाडी शाखा क्र. 77 येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आमदार अनंत (बाळा) नर यांच्या पुढाकाराने आणि माँसाहेब मीनाताई ठाकरे रक्त केंद्र, गोरेगाव यांच्या सहकार्याने हे शिबीर पार पडले. या शिबिरात 350 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते, आमदार व विभागप्रमुख सुनील प्रभू, शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर, विभाग संघटक शालिनी सावंत, विश्वनाथ सावंत, रवींद्र साळवी, शिवानी परब, लोना रावत, जितेंद्र वळवी, कैलासनाथ पाठक, बाळा साटम, जयवंत लाड, संदीप गाढवे, बाळा तावडे, अमरनाथ मालवणकर, प्रदीप गांधी, नंदकुमार ताम्हणकर, नितीश म्हात्रे, मयुरी रेवाळे आदी उपस्थित होते.

शिवसेना शाखा क्रमांक 206 च्या वतीने प्रभागातील दहावी-बारावीत उत्तीर्ण झालेल्या 375 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांच्या सहकार्याने हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव सुधीर साळवी, आमदार अजय चौधरी, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, नगरसेविका भारती पेडणेकर, सुप्रिया दळवी, नगरसेवक किरण तावडे, उपविभागप्रमुख गजानन चव्हाण, श्वेता राणे, विधानसभाप्रमुख लता रहाटे, विधानसभा संघटक वैभवी चव्हाण, शाखाप्रमुख हनुमंत बैजू – हिंदोळे, शाखा संघटक शुभदा पाटील, युवासेनेचे रोहित गायकवाड, भारती देवाडीगा आदी उपस्थित होते.

शिवसेना भायखळा विधानसभा शाखा क्र. 209 व 210 च्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिवसेना उपनेते-आमदार मनोज जामसुतकर व उपविभाग संघटक-नगरसेविका सोनम जामसुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर पार पडेल. यावेळी शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, महापालिका विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, आशीष चेंबूरकर, डॉ. प्रागजी वाजा, बबन गावकर, रमाकांत रहाटे, चंदना साळुंखे, राम सावंत, विजय कामतेकर, सूर्यकांत पाटील, हेमंत कदम, उषा पाटोळे, सुहास भोसले, निंगाप्पा चलवादी, रमेश रावल, काका चव्हाण, सलीम शेख, संध्या तळेकर आदी उपस्थित होते.

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष व बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ, लोअर परळ विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तब्बल 986 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई, आमदार सुनील शिंदे, आमदार महेश सावंत, महापालिका विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, निखिल सावंत, पद्मजा चेंबूरकर, अबोली खाडये, निशिकांत शिंदे, आशीष चेंबूरकर, दैनिक ‘सामना’चे दीपक शिंदे, बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे विश्वस्त विजय रावराणे, संजय चौकेकर, रवींद्र चिले आदी उपस्थित होते.

शिवसेनेच्या वतीने गोरेगावच्या पी/दक्षिण महापालिका प्रभाग समितीतील सर्व सुरक्षारक्षकांना वह्या वाटप करण्यात आले. शिवसेना विभाग समन्वयक दीपक सुर्वे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक मकरंद म्हात्रे, डॉ. राजू सामंत, अल्ताफ खान, उदय घाणेकर व मारुती पाटील उपस्थित होते.

शिवसेना कांजूर विभागाच्या वतीने प्रभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आमदार सुनील राऊत यांच्या सहकार्याने आयोजित उपक्रमात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी बाबा कदम, फादर रुडॉल्फ, श्वेता पावसकर, दीपक सावंत, सिद्धी जाधव, रवींद्र महाडिक, अल्पिता वारंग, विजय तोडणकर, धर्मराज पंत, योगेश पेडणेकर, दीपाली पाटील, सुमन म्हसकर आदी उपस्थित होते.

शिवसेना मागाठाणे प्रभाग क्रमांक 12 च्या वतीने विभागातील ज्येष्ठ नागरिक व पदाधिकाऱ्यांना छत्री वाटप करण्यात आले. नगरसेविका सारिका झोरे आणि विधानसभा निरीक्षक-मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य शशिकांत झोरे यांच्या सहकार्याने हा उपक्रम पार पडला. यावेळी उपनेते विश्वनाथ नेरूरकर, उपनेते विनोद घोसाळकर, माजी आमदार विलास पोतनीस, उदेश पाटेकर, धरम काळे, अशोक म्हामुणकर, रेखा बोऱहाडे, राजू मुल्ला, तुकाराम पालव, रोहिणी चौगुले, नंदकुमार मोरे, अमित मोरे, सचिन मोरे, माधुरी खानविलकर, योगेश देसाई, इतिश्री महाडिक उपस्थित होते.

शिवसेना शाखा क्र. 24 च्या वतीने वृक्षारोपण सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरणाचे संवर्धन करून प्रभाग स्वच्छ, सुंदर व हरित करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विभागप्रमुख संतोष राणे, विभाग संघटक मनाली चौकीदार, नगरसेवक सचिन पाटिल, विधानसभा संघटक कृष्णा मुळीक, विधानसभा संघटक ज्योती गावडे, उपविभागप्रमुख रवींद्र वेदपाठक, सतीश देसाई, पुरुषोत्तम (नंदू) मोरे, धर्मदास सावंत, रूपा नायक, प्रकाश शिंदे, दिलीप आयरे, नारायण आंबेडे, मनोहर कदम, गोपाल कोरी आदी उपस्थित होते.