आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबविणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजना, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना, नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान, आदर्श आश्रमशाळा, भगवान बिरसा मुंडा जोडरस्ते योजना राबविण्यात येत आहेत. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत विंधन विहिरी व सौरपंप हा घटक वनक्षेत्रालगतच्या गावातील आदिवासी शेतकऱयांना अनज्ञेय करण्यात आला आहे. आदिवासी घटक कार्यक्रमाकरिता 21 हजार 723 कोटी रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित आहे.