विद्यार्थ्यांचा राजकीय वापर करू नका! शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील दयानंद विद्यालयात सीएए समर्थनासाठी विद्यार्थ्यांकडून पोस्टकार्ड लिहून घेण्यात आली. शाळेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या भाजपच्या या छुप्या अजेंडय़ाची गंभीर दखल शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतली. किमान शाळा तरी राजकारणापासून दूर राहू द्यात असे सांगतानाच विद्यार्थ्यांचा वापर राजकीय विचार पसरवण्यासाठी होता कामा नये, अशा स्पष्ट शब्दांत शिक्षणमंत्र्यांनी शाळांना तंबी दिली आहे. याप्रकरणी माटुंग्याच्या दयानंद विद्यालयाचीही चौकशी करण्यात येत असून मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

सुधारित नागरिकत्क कायदा 10 जानेकारीपासून संपूर्ण देशात लागू करण्यात आला आहे. यासंदर्भातली अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली. या कायद्यावरून देशभरात निदर्शने सुरू असतानाच भाजपने आता शाळा, महाकिद्यालय, किद्यापीठ आणि किकिध शैक्षणिक संस्थामध्ये सीएएच्या समर्थनार्थ कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याचाच भाग म्हणून मुंबईतील दयानंद विद्यालयात सीएएच्या समर्थनार्थ सभा  घेण्यात आली. त्याचप्रमाणे सीएएच्या समर्थनाचे मजकूर असलेली पोस्टकार्डे विद्यार्थ्यांकडून तयार करून घेण्यात आली. याची गंभीर दखल शिक्षण विभागाने घेतली असून दयानंद विद्यालयाला कारणे दाखवा नोटीस बजावलीच पण राज्यभरातील शाळांनाही तशा नोटीसा पाठविण्यात आल्या.

काय आहे नोटीसमध्ये

शिक्षण संचालकांनी काढलेल्या नोटीसमध्ये राजकीय तसेच संवेदनशील कार्यक्रमांमध्ये शाळा व विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब शालेय शिस्त बिघडवणारी तसेच विद्यार्थ्यांच्या बालमनावर चुकीचे संस्कार व शैक्षणिक प्रगतीला बाधा आणणारी आहे.  त्यामुळे राजकीय तसेच संवेदनशील कार्यक्रम शाळेच्या आवारात घेऊ नयेत तसेच विद्यार्थ्यांनाही या कार्यक्रमात सहभागी करू नये असे स्पष्ट निर्देश राज्यभरातील महापालिका, जिल्हा परिषदा तसेच खासगी शाळांना बजावण्यात आल्या आहेत.

शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे, शैक्षणिक,  क्रीडाविषयक, आरोग्यविषयक कार्यक्रम व्हायला हवेत. असे असताना तिथे राजकीय कार्यक्रम घेतले जाणे म्हणजे विद्यार्थ्यांचे मन कलुषित करण्यासारखे आहे. निदान शाळांना तरी राजकारणापासून दूर ठेवायलाच हवे- वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री