Vasai News: वसई नवघर पूर्वेकडील औद्योगिक वसाहतीत भीषण स्फोट

Massive Explosion in Vasai Navghar Industrial Estate; One Injured, Multiple Units Damaged

गुरुवारी सकाळी नवघर पूर्वेकडील औद्योगिक वसाहतीत एका गाळ्यात मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे.सुदैवाने या घटनेत कोणतीहि जीवीतहानी झाली नसली तरी गाळ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

वस‌ई पूर्वेकडे औद्योगिक वसाहत आहे.या वसाहतीत मनीष इंडस्ट्री नंबर 1 मधील पहिल्या मजल्यावरील गाळा नंबर 114 मध्ये सकाळी 8:30 च्या सुमारास अचानक एक मोठा धमाका झाला. प्रथमदर्शनी वातानुकूलित यंत्रणेत हा स्फोट झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की गाळाच्या ग्रील,सज्जे उडून शेजारील दुसऱ्या इमारतीवर वर जाऊन पडले.

शेजारील 113 नंबर तसेच इतर गाळ्यांचे ही अतोनात नुकसान झाले आहे. याबाबतची खबर मिळताच पालिका अग्निशमन दल, रुग्णवाहिका, महावीतरण तसेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले ठाण्यात तक्रार दाखल केली.

या घटनेत एकजण जखमी झाला असून, पाच जणांना वाचविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. घटनेची माहिती कळताच शिवसेना शाखा प्रमुख गणेश पाटकर यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.

इंडस्ट्री इस्टेट इमारत ही धोकादायक बनली आहे. सज्जे, स्लॅब, भिंती देखील हलल्या आहेत ज्या कोसळण्याची पूर्ण शक्यता आहे. याबाबत महिला जिल्हा संघटक किरण चेंदवणकर यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पहाणी केली.

Massive Explosion in Vasai Navghar Industrial Estate; One Injured, Multiple Units Damaged

Keywords: Vasai industrial estate explosion, Navghar East factory blast, Manish Industry explosion, AC unit explosion Vasai, Vasai blast today, Fire brigade Vasai news, Factory unit damaged Vasai, Maharashtra industrial accident, Industrial accident Navghar, Vasai building danger after blast