
वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली असून, सुरुवातीच्या कलांमध्ये बहुजन विकास आघाडीला स्पष्ट आघाडी मिळताना दिसत आहे. वसई-विरारमधील सर्व प्रभागांमध्ये बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर असून, पक्षाची मजबूत पकड पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.
2010 साली अस्तित्वात आलेल्या वसई-विरार महानगरपालिकेवर सुरुवातीपासूनच बहुजन विकास आघाडीचा दबदबा राहिला आहे. यावेळीही मतमोजणीच्या प्रारंभिक फेऱ्यांमध्ये बविआचे वर्चस्व कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरम्यान, मतमोजणी केंद्रांवर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली असून, निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पुढील काही फेऱ्यांमध्ये कल स्पष्ट होणार असून, बहुजन विकास आघाडी आपली सत्ता कायम ठेवते का, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






























































