
नुकत्याच बारामतीत क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने आणि कराटे-डो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या तांत्रिक सहकार्याने पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धेत प्रबोधन गोरेगाव कराटे अकादमीच्या वेदा सावंतने रौप्य पदक जिंकण्याची किमया केली.
वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासून प्रबोधन गोरेगाव कराटे अकादमीत कराटेचे प्रशिक्षण घेत असलेल्या वेदाने यापूर्वी भूतान येथे झालेल्या दक्षिण आशियाई कराटे स्पर्धेत हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले होते. या स्पर्धेत तिने कांस्यपदक पटकावले होते. तसेच 2024 मध्ये झालेल्या स्पूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करण्याचा मानही तिला मिळाला होता.






























































