
वीणा आर. श्रीनिवास यांना महाराष्ट्र सर्कलच्या मुख्य पोस्टमास्तर जनरल पदावर पदोन्नती मिळाली असून त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. त्या 1991च्या बॅचमधील भारतीय टपाल सेवा अधिकारी आहेत. त्या पोस्टमास्तर जनरल (मेल आणि व्यवसाय विकास) या पदावर चेन्नई येथे कार्यरत होत्या. उच्च प्रशासकीय श्रेणीतील पदोन्नतीने त्या मुख्य पोस्टमास्तर जनरल झाल्या आहेत. लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्सशी संलग्न असलेल्या गोकूळ इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अॅण्ड इकोनॉमिक्स, पुणे येथून त्यांनी अर्थशास्त्राची पदवी घेतली आहे तसेच मुंबई विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात एमएची पदवी घेतली आहे. त्या प्रथम पोस्ट विभागात वरिष्ठ अधीक्षक रेल मेल सर्व्हिस म्हणून पुणे येथे रुजू झाल्या होत्या. त्यांनी पोस्टात विविध पदांवर काम केले आहे.



























































