
कोरानामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा आठ दिवसांसाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. देवरुख बाजारपेठेत अत्यावश्यक सेवा सुरु असून शुक्रवारपासून भाजी विक्रेतेही लॉकडाउनमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे शुक्रवारपासून देवरुखमध्ये भजीविक्री बंद होणार आहे. बुधवार आणि गुरुवार हे दोन दिवस आलेली भाजी विकली जाणार आहे .नागरीकांची गर्दी वाढू नये, यासाठी शुक्रवारपासून भाजी विक्री बंद ठेवण्याचा निर्णय भाजी विक्रेत्यांनी घेतला आहे. काही किराणा व्यापारीही आपली दुकाने बंद ठेवणार आहेत, असे व्यापारी संघटनेने सांगितले.




























































