कोल्हापूरात कोगे पुलावरून गाडी कोसळली; माजी सभापतीच्या वडिलांचा मृत्यू

465

कोल्हापूरातील कोगे (ता.करवीर) येथील नदीच्या पुलावरून चारचाकी गाडी नदीत कोसळून झालेल्या अपघातात करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांचे वडील गुंडोपंत सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी शिंगणापूर बंधाऱ्यावरुन नदीत कोसळून एका रिक्षाचालकाचा मृत्यू झाला आहे.

गुंडोपंत सूर्यवंशी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास स्वत:च चारचाकी गाडी चालवत कोगे बंधाऱ्याहून जात होते. अचानक वाहनावरील त्यांचा ताबा सुटल्याने गाडी बंधाऱ्याच्या पुलावरून नदीत कोसळली. ग्रामस्थांनी प्रयत्न करून मोटार पाण्याबाहेर काढली. अपघातात जखमी झालेल्या गुंडोपंत सूर्यवंशी यांना तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या