वर्सोवा विधानसभेतील युवासेना (युवती) पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वर्सोवा विधानसभेतील युवासेना (युवती) पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत. सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांचे काम बघून कायम करण्यात येतील.

विभाग युवती अधिकारीपदी भाग्यश्री आभाळे, उपविभाग युवती अधिकारीपदी करिश्मा कौंढार (शाखा क्र. 59, 60), नेहा धागे (शाखा क्र. 61, 62), श्रद्धा शिंदे (शाखा क्र. 63, 64) यांची तर विधानसभा समन्वयकपदी अंकिता मोहिते (शाखा क्र. 59, 60), रूपाली गावडे (शाखा क्र. 61, 62), श्रुती शर्मा (शाखा क्र. 63, 64), विधानसभा चिटणीसपदी वैभवी मुलाम (शाखा क्र. 59, 60), किरण प्रकाश पाटील (शाखा क्र. 61, 62) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. शाखा युवती अधिकारीपदी सेजल मोहिते (शाखा क्र. 59), शाखा समन्वयकपदी खुशी मोहिते (शाखा क्र. 59), उपशाखा युवती अधिकारीपदी देविका मांडवकर (शाखा क्र. 59), विनिता कदम (शाखा क्र. 59), जागृती मकवाना (शाखा क्र. 59) यांची नियुक्ती केली आहे.

शाखा युवती अधिकारीपदी मेघा ओडियल (शाखा क्र. 60), शाखा समन्वयकपदी निधी आंबेकर (शाखा क्र. 60), उपशाखा युवती अधिकारीपदी आशा कौंदार (शाखा क्र. 60), तनुश्री चिपळूणकर (शाखा क्र. 60) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शाखा युवती अधिकारीपदी अक्षता भोगडे (शाखा क्र. 61), शाखा समन्वयकपदी वंदना यादव (शाखा क्र. 61), उपशाखा युवती अधिकारीपदी सिद्धी गुप्ता (शाखा क्र. 61), निकिता खोतलेकर (शाखा क्र. 61), अशिका मिश्रा (शाखा क्र. 61), साक्षी सावंत (शाखा क्र. 61), दीप्ती पाटील (शाखा क्र. 61), वर्षा रागला (शाखा क्र. 61), पल्लवी चाबुकस्वार (शाखा क्र. 61), अर्चना मस्के (शाखा क्र. 61) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

शाखा युवती अधिकारीपदी उपासना गुप्ता (शाखा क्र. 62), शाखा समन्वयकपदी कांचन व्यवहारे (शाखा क्र. 62), उपशाखा युवती अधिकारी प्रणाली शिंदे (शाखा क्र. 62), अंजली डांगे (शाखा क्र. 62), सुचिता नेमाने (शाखा क्र. 62), सायली धावल (शाखा क्र. 62), पूजा विश्वकर्मा (शाखा क्र. 62), शालु यादव (शाखा क्र. 62), सानिया खान (शाखा क्र. 62), सविता योगेश माने (शाखा क्र. 62), कामिनी देवरे (शाखा क्र. 62), समीक्षा आग्रे (शाखा क्र. 62), कनिका मौर्या (शाखा क्र. 62), ज्योती विश्वकर्मा (शाखा क्र. 62) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. शाखा युवती अधिकारीपदी प्रिया यादव (शाखा क्र. 63), उपशाखा युवती अधिकारीपदी साक्षी साळवे (शाखा क्र. 63), प्रियंका यादव (शाखा क्र. 63) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. शाखा युवती अधिकारीपदी पूनम पवार (शाखा क्र. 64), शाखा समन्वयकपदी सोनाली सुतार (शाखा क्र. 64), उपशाखा युवती अधिकारी जान्हवी आर्दे (शाखा क्र. 64) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्याचे युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.