‘वीरूची एक्झिट’.. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी वयाच्या 89 व्या वर्षी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. बाॅलीवूडमध्ये त्यांना हिमॅन या नावाने ओळखले जात असे. धर्मेंद्र यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला आहे. पवनहंस जुहू येथील स्मशानभूमी मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

….तेव्हा रागाच्या भरात धर्मेंद्र यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर झाडलेल्या खऱ्या गोळ्या, ‘शोले’च्या सेटवर नक्की काय घडलेलं?

धर्मेंद्र यांना अनेक दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना काही दिवसांपूर्वी डिस्चार्ज देण्यात आला होता. अखेर घरी त्यांचे निधन झाले. ज्येष्ठ अभिनेत्याच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. करन जोहरने पोस्ट करत एका युगाचा अंत असे म्हणत पोस्ट केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

धर्मेंद्र अनेक दिवसांपासून आयसीयूमध्ये होते, त्यामुळे १० नोव्हेंबर रोजी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आले. हेमा मालिनी, सनी देओल, ईशा देओल आणि त्यांचे नातू करण देओल आणि राजवीर देओल यांनी त्यांना रुग्णालयात भेट दिली.

धर्मेंद्र यांचे पूर्ण नाव धर्मेंद्र केवल कृष्ण देओल असून, त्यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी पंजाबमधील नसराणी गावात झाला. त्यांनी १९६० मध्ये आलेल्या “दिल भी तेरा हम भी तेरे” या चित्रपटातून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ते १९६१ मध्ये आलेल्या “बॉय फ्रेंड” या चित्रपटात सहाय्यक भूमिकेत दिसले.

आठवणीतला ठेवा! धडकी भरवणारा बॉलिवूडचा सर्वात मोठा खलनायक जेव्हा धर्मेंद्र यांच्या पाया पडला होता

धर्मेंद्र यांनी दोनदा लग्न केले. त्यांचे पहिले लग्न प्रकाश कौर यांच्याशी झाले होते. त्यांच्यापासून त्यांना चार मुले आहेत: सनी देओल, बॉबी देओल, विजेता देओल आणि अजिता देओल. त्यानंतर १९८० मध्ये त्यांच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता हेमा मालिनीशी लग्न केले. धर्मेंद्र यांनी दुसऱ्या लग्नासाठी इस्लाम धर्म स्वीकारला. हेमा मालिनीपासून त्यांना दोन मुली ईशा देओल आणि अहाना देओल या आहेत.

धर्मेंद्र यांचे हिट चित्रपट
धर्मेंद्र यांनी त्यांच्या ६५ वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत अनेक हिट, सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले. शोले (1975), चुपके चुपके (1975), सीता और गीता (1972), धरमवीर (1977), फूल और पत्थर (1966), जुगनू (1973), आणि यादों की बारात (1973) हे त्यांचे उत्कृष्ट चित्रपट आहेत. रॉकी और रानी की प्रेम कहानी (2023) आणि ते बातों में ऐसा उल्झा जिया (2024) हे त्यांचे अलीकडील रिलीज आहेत.

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांचा 21 हा शेवटचा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तो अभिनेता अगस्त्य नंदा यांच्या वडिलांची भूमिका साकारताना दिसणार आहे. अगस्त्य नंदा हा ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा नातू आहे आणि तो २१ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. हा चित्रपट २५ डिसेंबर २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.