ज्येष्ठ संगीत अभ्यासक रामचंद्र पागे यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगीत रंगभूमी आणि लोकसंगीताचे ज्येष्ठ अभ्यासक तसेच गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे यांच्या जन्मस्थानाचा शोध घेऊन त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याबरोबरच वझेबुवा पुण्यतिथी सांगीतिक कार्यक्रमाचे संकल्पक रामचंद्र विठ्ठलराव पागे (वय 83) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच पुण्यात निधन झाले. रोजगार हमी योजनेचे जनक वि.स. पागे यांचे ते ज्येष्ठ पुत्र होत.
रामचंद्र पागे यांच्यामागे पत्नी, मुगला शिवप्रसाद पागे, सून, कन्या, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. रामचंद्र पागे हे मुंबई मराठी साहित्य संघाचे विश्वस्त प्रकाश पागे यांचे बंधू होत.

लहानपणापासून संगीताची आवड असलेल्या पागे यांनी बाई सुंदराबाई यांच्या आवाजातील लावणीपासून ते अभिजात संगीत, ठुमरी, गजल, दादरा, टप्पा अशा विविध गायनप्रकारातील नामवंत कलाकारांच्या आवाजातील ध्वनिमुद्रिकांचे संकलन केले होते. मा. कृष्णराव, पं. ओंकारनाथ ठाकूर यांच्यापासून विविध शंभर कलाकारांनी गायलेल्या ‘वंदे मातरम्’च्या ध्वनिमुद्रिका त्यांच्या संग्रही होत्या. संगीताची जाण वाढावी या उद्देशातून त्यांनी विविध कार्यक्रमांची निर्मिती केली होती.