
देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. प्रकृतीच्या कारणास्तव आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राजीनाम्याचे पत्र लिहिले आहे. उपराष्ट्रपती पदाच्या कार्यकाळात राष्ट्रपती भवन, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मंत्रिमंडळाकडून मिळालेले अमूल्य सहकार्य व पाठिंब्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. संसद सदस्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास, त्यांच्याकडून मला मिळालेले प्रेम व आपलेपणा मी कधीही विसरणार नाही. हिंदुस्थानसारख्या महान लोकशाहीत उपराष्ट्रपती पदासारखे महत्त्वाचे पद भूषविताना मला मिळालेला अनुभव अत्यंत मोलाचा आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.