मिंधे गटाचे आमदार किशोर दराडे यांना आज पुण्यात एका सामान्य तरुणाने चांगलाच हिसका दाखवला. वाहतूक कोंड़ीत गाडीचा सायरन वाजवणाऱ्या किशोर दराडे यांच्या गाडीला अडवून या तरुणाने त्यांना सर्वांदेखत जाब विचारला. त्याने या घटनेचा व्हिडीओ देखील केला असून त्यात आमदार दराडे यांची बोलती बंद झाल्याचे दिसून आले आहे.
View this post on Instagram
पुण्यात रविवारी मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली होती. त्यामुळे हजारो मराठा बांधव पुण्यात दाखल झाले होते. या रॅलीमुळे पुण्यातील अनेक भागातील वाहतूकीत बदल करण्यात आला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. याच वेळी आमदार किशोर दराडे यांची गाडी देखील बाजीराव मार्गावर या वाहतूक कोंडीत अडकली होती. त्यावेळी दराडे यांच्या गाडीचा ड्रायव्हर याने सिट बेल्ट लावला नव्हता. तसेच वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी तो सतत सायरन देखील वाजवत होता. दराडे यावेळी ड्रायव्हरच्या बाजुला बसलेले असताना देखील त्यांनी त्याला रोखले नाही.
दरम्यान तेथून जाणाऱ्या एका तरुणाने याबाबत किशोर दराडे व त्यांच्या चालकाला जाब विचारला. तसेच सायरन का वाजवतो असा प्रश्न देखील केला. त्यावर दराडे व त्यांच्या चालकाकडे काहीच उत्तर नव्हते. तरुणाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे दराडे यांची बोलतीच बंद झाली होती.