
सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, जो पाहून अनेक जण प्रेरितही होत आहेत. हा व्हिडीओ आहे कंटेंट क्रिएटर बादल ठाकूर यांचा. त्यांनी थेट पहाडांमध्ये एक साधा-सोपा मॅगीचा स्टॉल लावण्याचा प्रयोग केला. कोणतेही मोठे दुकान नाही, ना महागडे इन्फ्रास्ट्रक्चर.फक्त एक टेबल, एलपीजी सिलेंडर, काही भांडी आणि गरमागरम मॅगी बनवण्याची तयारी चालू आहे. थंड हवामानात गरमागरम मॅगी खायला कुणाला आवडणार नाही. मग काय विचारू नका. बादल ठाकूर यांनी दिवसाअखेर 300 ते 350 प्लेट मॅगी विकली. प्लेन मॅगी 70 रुपयांना आणि चीज मॅगी 100 रुपये असे दर त्यांनी ठेवले. यातून बादल ठाकूर यांनी एका दिवसाची कमाई सुमारे 21 हजार रुपये इतकी केली. हा संपूर्ण प्रवास त्यांनी व्हिडीओ स्वरूपात सोशल मीडियावर शेअर केला.



























































