बंगळुरू कारागृहातून कैद्याचा व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बंगळुरूच्या परप्पना अग्रहारा केंद्रीय कारागृहातून कैद्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने कारागृहातील तीन अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. पोलीस संचालक (जेल) आलोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी कठोर कारवाई करण्यात आली असून कारागृहाचे वॉर्डन निरंजन कामत, हनुमंतप्पा हडपद आणि शिवानंद कार्लाबत्ती यांना सेवेत हलगर्जीपणा केल्याच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले आहे. तसेच ड्युटीवर तैनात असलेल्या जेलरविरोधात कारवाई सुरू केली आहे.