ट्रेंड – ‘रील’ची रिऑलिटी

नागरिकशास्त्र हा विषय खरंतर पहिल्या वर्गापासून हवा. मात्र आपल्याकडं सगळ्या वाईट सवयी लागल्यानंतर ‘सिव्हिक सेन्स’ शिकवला जातो. तोपर्यंत नागरिकाचं जे व्हायचं ते झालेलं असतं. सध्या व्हायरल होत असलेली एक रील पाहून हा मुद्दा नीट ध्यानात येईल. या व्हिडिओत एक तरुणी एक्सप्रेस ट्रेनची काच स्वच्छ करताना दिसत आहे. ते पाहून तिचं कौतुक वाटतं. मात्र पुढच्या क्षणी ती जे करते ते पाहून संताप येतो. काच पुसून झाल्यावर ही तरुणी रिकामी बॉटल आणि टिश्यू रेल्वे रुळावरच टाकते. त्यानंतर लक्षात येतं की हे सगळं रीलसाठी होतं. हे पाहून तुमची सेवा नको, पण रील आवरा असं म्हणायची वेळ येते. हा व्हिडीओ https://tinyurl.com/5n9xttmh या लिंकवर पाहता येईल.